

Navale Bridge Accident : Save Life' Survey Findings
Sakal
प्रसाद कानडे
कात्रजचा नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यानचा उतार सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे तीन वर्षांपूर्वी ‘सेव्ह लाइफ’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले होते. शिवाय वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी हा महामार्ग योग्य नसल्याचे मतही त्या वेळी नोंदविण्यात आले. या मार्गावरील अभियांत्रिकी दोष नमूद करताना केवळ तत्कालिक नव्हे, तर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचनादेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या होत्या. मात्र महामार्ग प्राधिकरणाने तत्कालिक उपाययोजना करून दीर्घ उपाययोजनांकडे पाठ फिरवली. परिणामी अपघातांत आजही निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे.