Citizens Protest Navale Bridge : पुणे-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर १० दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने संतप्त नागरिकांनी प्रतीकात्मक 'दशक्रिया विधी' आंदोलन केले.
धायरी : नवले पुलाजवळ १३ नोव्हेंबरला झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. हा दुर्दैवी अपघात घडून दहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांचा रोष उफाळून आला.