Pune News : नवले पूल अपघातानंतर वाहतूक विभागाचा मोठा निर्णय; मानाजीनगरकडून महामार्ग प्रवेश बंद!

Traffic Management : नवले पूल परिसरातील अपघातानंतर महामार्ग आणि स्थानिक रस्त्यांवर मोठा सुरक्षा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक विभागाने मार्ग कायमस्वरूपी बंद करून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले आहे.
Pune News : नवले पूल अपघातानंतर वाहतूक विभागाचा मोठा निर्णय; मानाजीनगरकडून महामार्ग प्रवेश बंद!

Sakal

Updated on

धायरी : नवले पूल परिसरात नुकत्याच झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतूक विभागाने सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देत महत्त्वपूर्ण बदल लागू केले आहेत. नऱ्हे गावातील मानाजीनगरकडून येणाऱ्या वाहनांना आता थेट मुंबई–बंगळूर महामार्गावर प्रवेश करता येणार नाही. जीवित हानी झालेल्या घटनेनंतर वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट झाल्या असून भविष्यातील धोका टाळण्यासाठी हा प्रवेशमार्ग कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटचे दुभाजक लावून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या बाजूने येणाऱ्या वाहनांना फक्त सेवा रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Ganesh Visarjan 2026 In Wagholi Traffic Changes On Pune Ahilyanagar Road Alternative Routes And Market Closure
Mumbai-Pune Highway Traffic News
Ujlaiwadi Accident
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com