

Navale Bridge Traffic
sakal
धायरी : मुंबई– बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात सेवा रस्त्यांवरील अतिक्रमण, अनधिकृत रिक्षाथांबे, बेकायदा पार्किंग आणि अर्धवट राहिलेली विकासकामे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणे महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील वाहतुकीची परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.