
पुणे : 'कोरोना' विरूद्धच्या लढाईत रुग्णालयांना सज्ज रहाण्याचे आदेश असताना श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
Coronavirus : बारामतीवरही घोंगावू लागलंय कोरोनाचे संकट!
नर्हे येथे सिंहगड इंस्टिट्यूटचे नवले रुग्णालय आहे. तेथे नर्स, वाॅर्डवाॅय, क्लार्क, लॅब, स्वच्छता असे २ हजार ५०० पेक्षा जास्त जण येथे काम करतात. पण रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांचा पगार केलेला नाही. लाॅकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूं महाग झाल्या आहेत, दुकानदारांनी उधारीवर सामान देणे बंद केले आहे. तसेच घरभाडे यासह इतर अनेक गोष्टींसाठी पैसा नसल्याने हे कर्मचारी संकटात सापडले आहेत. रुग्णालय प्रशासनाने पगार दिल्यास किमान कोरोना'च्या काळात अवश्यक असलेला किराणा तरी भरून ठेवता येईल. रुग्णालय फक्त डाॅक्टरांचे पगार वेळेवर होत आहेत, कर्मचाऱ्यांचे नाही.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
"इतके दिवस पैसे नसले तरी घरा जवळील दुकानातून उधारीवर किराणा सामान आणत होतो, पण आता लाॅकडाऊनमुळे उधारीवर सामान मिळत नाही. आम्हीच उपाशी असेल तर आम्ही रुग्णांची सेवा कशी करणार. रुग्णालयात पती-पत्नी नोकरीला असल्याने दोघांचाही पगार नसल्याने घर चालवायचे कसे असा प्रश्न पडला आहे," असे नर्सिंग स्टाफ म्हणून काम करणारे शशिकांत आव्हाड यांनी सांगितले.
रुग्णालयाच्या कामकाज पहाणाऱ्या अधिकार्यांनी कामगारांचे पगार झाला नसल्याचे मान्य केले. समाज कल्याण विभागाकडून १९ कोटी रुपये व विद्यार्थांचे शुल्क साडे तीन कोटी रुपये येणे बाकी आहे. परंतु लाॅकडाऊनमुळे आम्हाला कोणताही प्रकिया करता येत नसल्याने पगार देता आलेले नाहीत, असे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सिंहगड इंस्टिट्यूटचे प्रमुख मारूती नवले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.