

नवीपेठेत दोन मंडळांच्या
तरुणांचे एकमेकांना मारहाण
तिघे जखमी; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची मध्यस्थी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : नवरात्रोत्सवाच्या आगमन मिरवणुकीत नवीपेठेत दोन मंडळांच्या तरुणांमध्ये वाद झाला. मिरवणुकीत लेझीम खेळताना धक्का लागल्याच्या कारणातून हा वाद उद्भवला. लेझीमने एकमेकांना मारहाण केल्याने तिघे जखमी झाले. फौजदार चावडी पोलिसांनी वेळेत मध्यस्थी करून वाद मिटवला. यावेळी पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलिस आयुक्त अरुण देवकर हेही घटनास्थळी पोचले. त्यांनीही दोन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितले.
सोलापूर शहरातील वडार गल्लीतील महाकाल मंडळातील एकजण आणि जुनी मिल चाळ परिसरातील दोघे जखमी झाले आहेत. वाद वाढण्यापूर्वीच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार तेथे पोचले. त्यानंतर अन्य वरिष्ठ अधिकारीही तेथे आले. यावेळी नगरसेवक विनोद भोसले आणि दुसरीकडील सुशील बंदपट्टे यांच्यासह अन्य पदाधिकारीही त्या ठिकाणी होते. त्यांनी आपापसांत मिटवून घेण्याची भूमिका घेतली. बंदपट्टे म्हणाले, नगरसेवक विनोद भोसले आणि मी पूर्वी एकाच पक्षात होतो, आम्ही मिटवून घेऊ. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनीही दोन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना समज दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार अंमलदारांनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.