Pune नवी सांगवीत तुंबतेय पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navi sangvi

Pune : नवी सांगवीत तुंबतेय पाणी

नवी सांगवी : गेल्या काही आठवड्यांपासून सततचा पडणारा मोठ्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडत आहे.ठिकठिकाणी तुंबणारे पाणी,सखल भागात होत नसलेला पाण्याचा निचरा, तुंबलेल्या पाण्यामुळे पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांसह मलनिःसारण वाहिन्या तुंबल्याने नागरिकांच्या घरात घाण पाणी मैलामिश्रित पाणी घुसत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

गुरूवार सायंकाळी सांगवी परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या प्रकारामुळे रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.नवी सांगवी येथील आदर्श नगर,चैत्रबन,शितोळे मळा या ठिकाणी पाणी तुंबल्याने रहिवाशांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागले. नवी सांगवी पिंपळे गुरव येथील विनायक नगर येथे वाहिन्या तुंबल्याने येथील रहिवाशांच्या घरात घाण पाणी घुसल्याने रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

सखल भागातील जुनी घरे, त्यातच रस्ते, सेवावाहिन्या टाकण्याची चुकीची झालेली कामे, यामुळे पाणी तुंबण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाणी तुंबल्याने मैलामिश्रीत पाण्याचा उलटा प्रवाह घरांमधे, रस्त्यावर साठून नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मोठ्या पावसात या भागात हा नेहमीचा त्रास असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी येथील रहिवाशांमधून मागणी होत आहे.याबाबत स्थापत्य विभागाशी संपर्क साधला असता होवू शकला नाही.

कोट- कालच्या पावसामुळे दवाखान्यात पाणी आले.रुग्ण व नातेवाईकांना याचा त्रास सहन करावा लागला.प्रशासनाकडून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे.

डॉ.अजय यादव ,रहिवाशी

कोट- पाणी ओव्हरफ्लो झाल्याने घरांमध्ये मैलामिश्रित घाणपाणी शिरले. याचबरोबर संपूर्ण गल्ली रस्ता पाण्याने भरतो. येथील हा नेहमीचा त्रास असून यावर उपाय योजना करावी.

द्रोणाचार्य कोळी, रहिवाशी

कोट- मलनिःसारण विभागाकडून येथील तुंबलेल्या वाहिन्यांद्वारे रिसायकल गाडीद्वारे स्वच्छता करण्यात आली आहे.मोठ्या पावसात अतिरिक्त पाण्यामुळे पाणी तुंबते.आमच्या विभागाकडून येथील नियमित स्वच्छता करण्यात येते.

अनिल राउत, अभियंता मलनिःसारण ह प्रभाग