

vasant more
esakal
पुण्यातील नवले पुलावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते वसंत मोरे हे थोडक्यात वाचले. काल (गुरुवार) दुपारी ते फेसबुक लाईव्हद्वारे नवले पुलावर सतत होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर बोलत होते. त्याचवेळी एक छोटा हात्ती भरधाव वेगाने त्यांच्या विरुद्ध दिशेने येऊन थेट वसंत मोरे यांच्या अंगावर घुसला.