esakal | जागर आदिशक्तीचा, उत्सव नवरंगांचा; ‘सकाळ’चा उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

जागर आदिशक्तीचा, उत्सव नवरंगांचा; ‘सकाळ’चा उपक्रम

जागर आदिशक्तीचा, उत्सव नवरंगांचा; ‘सकाळ’चा उपक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : उत्सव आपल्याला ऊर्जा देत असतात. कोरोनाचा संसर्ग कमी होऊन सर्वकाही पूर्वपदावर येत असताना नवरात्रोत्सव आला आहे. नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा जागर असल्याने महिलांसाठी या उत्सवाचे एक खास महत्त्व असते. नवरंगांचा हा उत्सव अधिक आनंददायी होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ‘सकाळ’तर्फे ‘जागर आदिशक्तीचा, नवरंग उत्सव’ साजरा होत आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे आपण सर्व जण ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करीत असलो, तरीही आपापल्या परीने आपण हे उत्सव साजरे करीत असतो. नवरात्रामध्ये घातल्या जाणाऱ्या कपड्यांच्या रंगांतून हा सांस्कृतिक उत्सव केला जातो. त्याचबरोबर स्त्री-शक्तीचे दर्शन घडते, हाच उद्देश नवरात्रातील ‘नवरंगां’मध्ये आहे. शारदीय नवरात्रीला गुरुवारपासून (ता. ७) सुरुवात होत आहे.

नवरात्रात महिलांनी नऊ दिवस नऊ रंगांची वेशभूषा करायची आहे. त्याची छायाचित्रे खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवायची आहेत. त्या दिवसाच्या रंगाचा फोटो, त्याच दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत पाठवावा. ग्रुप फोटोमध्ये चारपेक्षा जास्त महिलांचा समावेश असावा. फोटो पाठविताना सोबत ग्रुपचे नाव, कंपनीचे नाव, सोसायटीचे नाव, फोन नंबर देणे आवश्‍यक आहे. पुढच्या रंगाचे फोटो आधीच पाठविल्यास त्याला प्रसिद्धी दिली जाणार नाही. या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक पेशवाई क्रिएशन व पेशवाईज् श्रीमंत कलेक्शन हे आहेत. छायाचित्र निवडण्याचे व नाकारण्याचे अंतिम अधिकार ‘सकाळ’ व्यवस्थापनाकडे असतील.

संपर्कासाठी मेल आयडी पुढीलप्रमाणे -

पुणे शहर

sakalpune.navrang@gmail.com

पिंपरी-चिंचवड

sakalpcmc.navrang@gmail.com

पुणे जिल्हा

sakaldistrict.navrang@gmail.com

नगर

sakalnagar.navrang@gmail.com

loading image
go to top