
"Pune Navratri 2025: Police enforce traffic changes, vehicles banned near key temples."
Sakal
पुणे : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री तांबडी जोगेश्वरी, श्री चतु:शृंगी, श्री भवानी माता आणि सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात सोमवार (ता. २२) पासून दोन ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.