
Sharadiya Navratri 2025
sakal
पुणे : ‘आदिमायेचा उदो उदो’, ‘अंबाबाईचा उदो उदो’ असे म्हणत मंगलमय वातावरणात सोमवारी शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. शहरातील सर्व देवींच्या मंदिरासह घरोघरी विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. भाविकांनी सकाळपासूनच देवीच्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.