
Pune Crime
Sakal
वारजे : सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. याच अनुषंगाने, वारजे माळवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत परिसरात दहशत माजविणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.