

सकाळ वृत्तसेवा
गडचिरोली, ता. १५ : हिंसेचा मार्ग सोडून सरकारपुढे शरणागती पत्करलेल्या गडचिरोलीतील १०० माजी नक्षलवाद्यांनी बंगळूर येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला. शांतता, आत्मचिंतन आणि समाजोपयोगी कार्याच्या माध्यमातून नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा संदेश या भेटीतून त्यांना मिळाला.
या प्रवासाला तीन सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. माजी नक्षलवावाद्यांचा गट गडचिरोली पोलिस मुख्यालयातून बंगळूरकडे रवाना झाला. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या सहकार्याने तसेच लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील आणि गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
श्री श्री रविशंकर यांच्यासोबत झालेल्या संवादामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शांतता, धैर्य आणि सामाजिक विकास याविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी ऊर्जा सेंद्रिय शेती, जलसंधारण, पशुकल्याण आणि ग्रामविकास यांसारख्या विधायक उपक्रमांकडे वळविण्याचे आवाहन सहभागींना केले.
सहभागींनी आश्रम परिसरातील विविध उपक्रमांची पाहणी केली. सेंद्रिय शेती, जलसंधारण, गोशाळा, योग-ध्यान आणि सामुदायिक सेवा आदी उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली.
..
आत्मचिंतनाचे काही क्षण
दीर्घ प्रवासाचा थकवा असतानाही सहभागी माजी नक्षलवादी निर्धारित वेळेनुसार संध्याकाळच्या सत्रात सहभागी झाले. पुढील काही दिवसांत ध्यान, योग, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया त्यांच्या दिनक्रमाचा भाग बनल्या. सुरुवातीला मनात असलेले प्रश्न आणि संकोच हळूहळू कमी होत गेले आणि त्यांची जागा सहभाग व आत्मचिंतनाने घेतली. शांतपणे श्वासावर लक्ष केंद्रित करताना काहींच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.