

Red Tapism Stalls NCC Expansion in Maharashtra: Lack of Training Academies and Staff Shortage
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : युवा सक्षमीकरणाच्या केवळ वल्गना करणाऱ्या राज्य सरकारच्या उदासीनतेचा आणि लालफीतशाहीचा फटका महाराष्ट्रातील ‘राष्ट्रीय छात्र सेने’ला (एनसीसी) बसत आहे. राज्यात तब्बल दीड लाख छात्र असतानाही त्यांना लष्करी प्रशिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देण्यासाठी हक्काची एकही स्वतंत्र प्रशिक्षण अकादमी उपलब्ध नाही. त्यातच राज्य सरकारच्या अखत्यारीतील ‘गट’ व ‘युनिट’ पातळीवरील ४० ते ६० टक्के पदे रिक्त आहेत. छात्रांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना रिक्त जागा आणि अकादमीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.