Baramati APMC Result: बारामतीत राष्ट्रवादीच पुन्हा! १८ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय

Baramati APMC Result
Baramati APMC Resultesakal

Baramati APMC Result: राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल आज (शनिवारी) जाहीर होत आहेत. यामध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ करत राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे.

Baramati APMC Result
Crime Pune: पुणे हादरले! २४ तासात ३ बलात्कार, एका अल्पवयीन मुलीचा समावेश

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १८ पैकी १८ उमेदवार निवडणून आले आहेत. तर भाजपचा एकही उमेदवार निवडणून आला नाही.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत 97.37 टक्के मतदान पार पडलं होतं. 2628 मतदारांपैकी 2559 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Baramati APMC Result
राष्ट्रवादी पुन्हा! विरोधकांना चितपट करत दिलीप मोहितेंचा दणदणीत विजय; खेड बाजार समितीवर पुन्हा झेंडा APMC Election 2023

या निवडणुकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात राहिले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलचे 17 उमेदवार तर भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे 16 उमेदवारांमध्ये लढत होती. तर एक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होता. यामध्ये राष्ट्रवादीचा एक उमेदवार या अगोदरच बिनविरोध झाला होता. त्यामुळे 18 ऐवजी 17 जागांवर निवडणूक होती.

राष्ट्रवादीचे नीलेश भगवान लडकत हे कृषी पतसंस्था इतर मागासवर्ग मतदार संघातून बिनविरोध झाले होते. शेतकरी विकास पॅनलचे 16 उमेदवार रिंगणात राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रयत पॅनलने 18 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक बिनविरोध झाल्याने त्यांचे सतरा उमेदवार रिंगणात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com