Agitation | कंगना राणावतच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation
कंगना राणावतच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

कंगना राणावतच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे - देशाला स्वतंत्र भीक म्हणून मिळाले आहे असे संतापजनक वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करून निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसने जंगली महाराज रस्त्यावरील झाशीच्या राणी लक्ष्मीबाई पुतळा येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी कंगना राणावतच्या फोटोला चपलांनी मारून, घोषणाबाजी करून तिचा निषेध करण्यात आला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख , नगरसेवक सचिन दोडके, महिला शहराध्यक्ष मृणालीनी वाणी, युवती शहराध्यक्ष सुषमा सातपुते, युवती प्रदेश सरचिटणीस पूजा झोळे, कार्याध्यक्ष अँड.श्रुती गायकवाड आदी यावेळी सहभागी झाले होते.

हेही वाचा: पुणेकर असाल तर 'या' चार पॉडकास्‍ट्स ऐकण्‍याचा आनंद नक्‍की घ्या!

भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांच्यापासून शहीद भगतसिंग , सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस या महान नेत्यांनी निकराचा लढा दिला. मात्र केवळ हुकूमशहांच्या पायाशी निष्ठा वाहून कालपरवा पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या कंगना रनौत या अभिनेत्रीने १९४७ ला देशाला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली" असे संतापजनक वक्तव्य करून देशाच्या स्वतंत्र्यासाठी शहीद झालेल्या वीरांचा अवमान केला आहे, अशी टीका शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

loading image
go to top