esakal | पुण्यात मॉल, अभ्यासिकांना परवानगी; दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

पुण्यात मॉल, अभ्यासिकांना परवानगी; दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

पुणे- पुण्याच्या कोरोना निर्बंधांबाबत मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या आत आला आहे. त्यामुळे सोमवारपासून कोरोना निर्बंध अधिक शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवडसाठी निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. कारण त्याठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या वरती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. (ncp ajit pawar said about pune unlock guidlines)

पुण्यातील निर्बंध येत्या सोमवारपासून आणखी शिथिल होत आहेत. यात दुकाने आता 7 वाजेपर्यंत सुरु करण्यास मुभा देण्यात येणार आहेत. तसेच रेस्टारंट, हॉटेल 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. मॉल सोमवारपासून सुरु ठेवता येतील. तसेच अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यात येतील. असे असले तरी चित्रपट गृहे, नाट्यगृहे बंदच राहतील. अशी माहिती पवारांनी दिली. हे नवे नियम सोमवारपासून लागू होतील.

हेही वाचा: यंदाही पायी वारी आणि विठ्ठल दर्शन नाहीच - अजित पवार

सोमवारी मॉल बाबत नियमावली जाहीर करण्यात येईल. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील, हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू राहील. पुण्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुरू केली जाणार नाहीत. अभ्यासिका, वाचनालय सुरू केले जाणार आहेत. दिव्यांगाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे, असं अजित पवार म्हणाले. असे असले तरी लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास इतर ठिकाणीही निर्बंध शिथिल करण्यात येतील, असं अजित पवार म्हणाले.

पुणे ग्रामीणमध्ये निर्बंध लागू राहणार :

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील केवळ वेल्हा तालुक्यातील पॉझिटिव्हिटी रेट सहा टक्के आहे. त्या व्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट हा नऊ ते अकरा टक्के आहे. जिल्ह्यासाठी एकच धोरण आहे. प्रत्येक तालुक्यातील पॉझिटिव्हिटी रेट वेगळा असून तालुकानिहाय निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे ग्रामीण भाग हा चौथ्या टप्प्यातच असून, त्या ठिकाणी सध्या असलेले निर्बंध लागू राहतील. ग्रामीण भागाला निर्बंध शिथिल करण्याबाबत आणखी आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे.

आजच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय :

येत्या सोमवारपासून हे सुरू होणार :

- कोचिंग क्लासेस आणि ग्रंथालय सुरू होणार

- दुकानाची वेळ चार वाजेपर्यंत होती, ती आता सायंकाळी सात वाजेपर्यंत असेल

- हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बियर बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील.

- मॉल्स 50 टक्के क्षमतेने नियमित वेळेनुसार परवानगी राहील

- खेळाची मैदाने सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत सुरू राहतील.