

NCP Maharashtra Women Wing Gets New Chief Vaishali Nagawade Succeeds Rupali Chakankar in Key Party Role
esakal
-प्रकाश शेलार
खुटबाव ( पुणे) : खामगाव (तालुका दौंड) येथील वैशाली नागवडे यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. मुंबई येथे नागवडे यांना सदर निवडीचे पत्र पत्र राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. माजी महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनामा नंतर सदर पद गेली सहा महिन्यांपासून रिक्त होते. चाकणकर यांच्या जागी राष्ट्रवादी पक्षातील सहकारी नागवडे यांची निवड झाली आहे.