शरद पवारांची पत्रकार परिषद : पुण्यातली मार्केट शिफ्ट करण्याचा पॉझिटिव्ह विचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

व्यापाराला कोरोनामुळं खूप मोठा फटका बसला आहे. यातून सावरण्यासाठी आठ-दहा महिने किंवा एक वर्षही लागेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

पुणे : पुण्यातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी पवार यांच्यापुढे मागण्यांचा पाढा वाचला. त्या मागण्यांच्या गांभीर्याने विचार करू, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली आहे. मार्केट शिफ्ट करण्याविषयी, महसूल खातं जागेची माहिती देऊ शकेल, या संदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यावर उद्याच बैठक होईल. व्यापाराला कोरोनामुळं खूप मोठा फटका बसला आहे. यातून सावरण्यासाठी आठ-दहा महिने किंवा एक वर्षही लागेल.

पवार म्हणाले, 'असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुण्यातील मार्केट व्यापार शिफ्ट करण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे. मेट्रोची सुविधा असावी, कर्मचाऱ्यांच्या निवासाची सुविधा असावी, यासाठी मोठी जागा लागणार आहे. राज्य सरकारने दुकाने उघडण्याची अनुमती दिली. परंतु, ग्राहकांच्या मनातही मोठी भीती त्यामुळं हवा तसा व्यवसाय होत नाही, हे वास्तव आहे. व्यापारी वर्ग हवी ती काळजी घेण्यासाठी तयार आहे. व्यापारी संघाचे म्हणजे योग्य आहे. या संदर्भात राज्य सरकार, पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून, पुढं पाऊल टाकावं लागेल. व्यापाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी आहे. यापुढेही महासंघाच्या प्रमुखांसाठी चर्चा करून, पुन्हा माहिती घेऊनच निर्णय घेऊ.' 

हे वाचा - शरद पवारांसारख्या नेत्याला मातोश्रीवर वारंवार जावं लागणं शोभतं का?

शरद पवार म्हणतात,
पुण्यात नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती 
पुण्यातील सर्व व्यवसायांवर कोरोनाचा परिणाम 
व्यापाऱ्यांनी कोरोनाचे संकट गंभीर्याने घेतले आहे.
व्यापार झाला पाहिजे, ग्राहकांनाही सुविधा मिळायला हव्यात
व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू 
व्यवसाय बंद तरी, वीज बिलं येत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp chief sharad pawar say thinking about shift pune markets