पुण्यात पोस्टर व्हायरल; काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना एकसाथ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चौदा दिवस झाले तरी अद्याप सत्ता स्थापन झाले नाही. यात शिवसेनेने सत्तेत समान वाटा मिळावा अशी मागणी लावून धरली आहे. यावरून चांगलेच राजकारण तापले असताना या फ्लेक्समुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. 

पुणे : एकीकडे सत्तेचा तिढा झालेला असताना पुण्यात व्हायरल झालेल्या पोस्टरमुळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी एकसाथ आहेत का अशी चर्चा पुुणेकरांमध्ये सुरु आहे. कोंढव्यात ज्योती हॉटेल चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनिस सुंडके यांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेला फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चौदा दिवस झाले तरी अद्याप सत्ता स्थापन झाले नाही. यात शिवसेनेने सत्तेत समान वाटा मिळावा अशी मागणी लावून धरली आहे. यावरून चांगलेच राजकारण तापले असताना या फ्लेक्समुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. 

रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत असताना कोंढवा परिसरातील या फ्लेक्समध्ये सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो लावला आला आहे. 

त्यावर ''महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने, संघर्षातील आदेश स्विकारला आहे…! बळीराजाच्या मनातील अन् हातातील घड्याळाच्या अचूक वेळेने, धनुष्यबाणातील अचूक वेधाने जनता राजा स्वीकारावा' हा मजकूर लिहिलेला आहे, यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

 एकमेकांचे विरोधक असलेल्या नेत्यांचे एकाच फ्लेक्सवर फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या फ्लेक्सची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP, Congress and Shiv Sena leader photo on Poster goes viral in pune