
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने वर्धापनदिनाचा मोठा कार्यक्रम बालेवाडी येथे घेतला आहे. राज्यभरातून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या या कार्यक्रमाद्वारे पक्षाकडून महापालिका निवडणूकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मेळाव्याच्या नियोजनाच्या बैठकीसाठी तब्बल २१ माजी नगरसेवकांसह इच्छुक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महापालिकेसाठी आत्तापासूनच "फिल्डींग' लावण्यास सुरवात केली आहे.