Vidhan Sabha 2019 : पिंपरीत गोंधळ, राष्ट्रवादीने दिले दोन उमेदवारांना एबी फॉर्म

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चांगलाच गोंधळ उडाला आहे. पिंपरीतून निवडणूकीसाठी अण्णा बनसोडे आणि सुलक्षणा धर दोघांनीही उमेदवारी अर्जासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म दाखल केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चांगलाच गोंधळ उडाला आहे. पिंपरीतून निवडणूकीसाठी अण्णा बनसोडे आणि सुलक्षणा धर दोघांनीही उमेदवारी अर्जासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म दाखल केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीने पिंपरीत उमेदवार बदलला

पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुलक्षणा धर यांची उमेदवारी रद्द करून अण्णा बनसोडे यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र, सुलक्षणा धर यांनी मीच पक्षाची अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे. तररीही अण्णा बनसोडे यांनीही एबी फॉर्म दाखल केला असल्याने आता पिंपरीत गोंधळ उडाला आहे. 

गुरुवारी नगरसेविका सुलक्षणा धर यांचे नाव यादीत होते. यावर नाराजी व्यक्त करत माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरत असल्याची घोषणा केली होती.  दरम्यान, शुक्रवारी सकाळी पक्ष नेतृत्वाने धर यांचा पत्ता कापून बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांनी उमेदवारी अर्जही भरला.  

दरम्यान, अजित पवार यांनी आज, बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यात पवार यांनी पिंपरीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारीविषयी विचारण्यात आले. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘सुरुवातीला आम्ही पिंपरीची उमेदवारी जाहीर केली होती. पण, कालपासून पिंपरीतील अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर आम्ही अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना एबी फॉर्म दिला. आज, अण्णा बनसोडे यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.’ पिंपरीत गेल्या दोन निवडणुका बनसोडे यांनी लढवल्या होत्या. 2009मध्ये ते पिंपरीतून निवडून आले. तर, 2014मध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांच्या विरुद्ध त्यांचा अडीच हजार मतांनी पराभव झाला होता. यंदाही त्या दोघांमध्येच लढत होणार आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP gives AB form to 2 candidates in Pimpari for Maharashtra Vidhan Sabha 2019