esakal | 'चंपा'ला पवार कुटुंबाशिवाय काही दिसत नाही: अजित पवार

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

भोसरी शहरात अराजकता वाढलेली आहे. भाजप-शिवसेनेने वाढलेला भ्रष्टाचार थांबवणे गरजेचे असून गुन्हेगारी रोखणे काळाची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीतर्फे चिंचवडमधून राहूल कलाटे, भोसरीत विलास लांडे पुरस्कृत केले आहे. तर पिंपरीतून अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दर्शविला आहे, तर नाराज झालेल्या उमेदवारांची समजूत काढतो, एकेकाला आत घेतो आणि नाराजी काढतो.

'चंपा'ला पवार कुटुंबाशिवाय काही दिसत नाही: अजित पवार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : 'चंपा'ला पवार कुटुंबाशिवाय दुसरे काही दिसत नाही का? चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील शॉर्टकट, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पटलांवर निशाणा साधला. 

पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आगामी निवडणुकांमध्ये पवार कुटुंबातील तरुण व्यक्तिमत्व राजकारणात आले असते, तर स्वागत आहे असे पाटील यांनी वक्तव्य केले होते. यावर बोलताना अजित पवार यांनी चंपा म्हणत टीका केली.

पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी अजित पवारांनी उमेदवार आणि नाराज उमेदवारांची बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत पार्थ पवारच काय घेऊन बसता मी म्हणतो म्हणून तो राजकारण बाहेर राहील मी त्याचा बाप आहे, असे अजित पवारांनी म्हटल आहे. विधानसभा निवडणुकीमधे पार्थ पवार सक्रिय सहभाग नसल्याचा प्रश्न विचारला असता, ही राज्याची निवडणूक आहे, पवार कुटुंबाची नाही. मला वाटतं त्याने न यावं, मी त्याचा बाप आहे, अशा शब्दात अजित पवारांनी उत्तर दिले.

भोसरी शहरात अराजकता वाढलेली आहे. भाजप-शिवसेनेने वाढलेला भ्रष्टाचार थांबवणे गरजेचे असून गुन्हेगारी रोखणे काळाची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीतर्फे चिंचवडमधून राहूल कलाटे, भोसरीत विलास लांडे पुरस्कृत केले आहे. तर पिंपरीतून अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दर्शविला आहे, तर नाराज झालेल्या उमेदवारांची समजूत काढतो, एकेकाला आत घेतो आणि नाराजी काढतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.