Sunil Shelke: 'मी कधी कोणाला चापट मारली…',आवारेंच्या हत्येप्रकरणी आमदार सुनील शेळकेंचं स्पष्टीकरण

आवारेंच्या हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं
Sunil Shelke
Sunil ShelkeEsakal

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येच्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह एकूण सात जणांवर आवारे यांच्या हत्येच्या कटात सहभागी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शेळके म्हणाले कि, किशोर आवारे यांच्यासोबत राजकारणामध्ये एकत्रितपणे काम केलं. आमचे मतभेद असतील पण मनभेद नव्हते. परंतु, काही मंडळी यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अस कोणी करत असेल तर ते कोणी करू नये. या घटनेला राजकीय वळण देऊ नये असं आवाहन देखील शेळके यांनी केलं आहे. पोलिस यंत्रणेला मी पूर्ण सहकार्य करत असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.

किशोर आवारे यांची काल (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेला राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. आमदार सुनील शेळकेसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोप सुनील शेळके फेटाळले आहेत. ज्या व्यक्तीचा या हत्येच्या पाठीमागे हात आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असंही त्यांनी म्हंटलं आहे.

काय म्हणाले आमदार सुनील शेळके?

काल दुपारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची नगरपालिकेच्या आवारामध्ये दुपारी हत्या करण्यात आली. या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो. कालची घटना झाली त्या घटनेनंतर आज सकाळी सात वाजता सुनील शेळके नोटरीचेबल, फोन स्विच ऑफ अशा पद्धतीने माध्यमाने ज्या काही बातम्या लावण्याचे काम केलं त्या अनुषंगाने मी पत्रकार परिषद घेत आहे.

Sunil Shelke
Kishor Aware: सहा महिन्यापासून होता आवारेंच्या जिवाला धोका; NCPच्या आमदारावर कुटुंबियांचे मोठे आरोप

काल जी घटना घडली. या घटनेमध्ये कोण आरोपी आहेत. ही घटना का? केली यामागची सत्यता काय? आहे. त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय आहे? ते कोण गुन्हेगार आहेत याची सखोल चौकशी पोलीस खात्यातील सर्व अधिकारी प्रामाणिकपणे करण्याचं काम करत आहेत. परंतु, जी काही घटना घडली या मावळ तालुक्याला वेगळा पायंडा पाडण्याचं काम राजकारणाच्या माध्यमातून किंवा समाजकारणाच्या माध्यमातून कुणी करू नये याच करता आम्ही सातत्याने देखील एक समान जास्त पणाची भूमिका घेऊन काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहेत.

Sunil Shelke
Kishor Aware : किशोर आवारे हत्येप्रकरणात आमदार सुनील शेळके यांचं नाव; आईच्या तक्रारीने खळबळ

मागील काही दिवसापूर्वी किशोर आवारे असतील किंवा आम्ही असू राजकारणामध्ये एकत्रितपणे काम केलं. परंतु, आमचे विचार मतभेद असतील परंतु मनभेत नव्हते. काही मंडळी यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर कृपया करून अशा घटनेला राजकीय वळण देऊ नका.

घटनेची सत्यता समाजापुढे न्याय देवता आणि पोलीस यंत्रणा आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कालच्या घटनेमध्ये संध्याकाळी जी काय नोंद करण्यात आली त्यामध्ये माझं स्वतः सुनील शेळके माझा भाऊ सुधाकर शेळके संदीप गराडे आणि इतर काही अशा व्यक्तींकडून हत्येचा कट करण्यात आला त्यामध्ये सांगण्यात आलं.

Sunil Shelke
Kishor Aware: तळेगावातील जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष किशोर आवारेंची निर्घृण हत्या

परंतु, ही फिर्याद देत असताना शेवटी एखाद्या कुटुंबातला व्यक्ती गेल्यावरती त्या परिवाराची भावना देखील तीव्र असते हे आम्ही समजू शकतो. परंतु, त्या मागचे खरे कोण सूत्रधार आहेत कोण हे सगळं घडवत हे कोण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतो हे देखील आम्ही पुढील काळामध्ये शोध घेऊन तो नक्कीच जनतेपुढे आणल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणालेत.

पुढे ते म्हणाले कि, राजकारणापासून वेगळं व्हायचं असेल तर आज होईल परंतु बदनाम करून जर कोणी मला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मी कदापी सहन करणार नाही सखोल चौकशी करा याच्यातून कोण गुन्हेगार आहेत यांची देखील चौकशी करा आणि यामागे कोण राजकारण करतोय यांची देखील आपण चौकशी केली पाहिजे. सामाजिक जीवनामध्ये व्यावसायिक जीवनामध्ये काम केलं. माझ्या राजकीय जीवनात कधी साधी कोणाला चापट मारली किंवा कुणाला शिवी दिली नाही.” असेही शेळके म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com