नावाचा शॉर्टफॉर्मच तसा आहे, राग मानू नये; जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

  • जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला.

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उडी घेतली असून, त्यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला. ते पुणे पदवीधर निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ पुण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जयंत पाटील म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने कधीही टरबुज्या म्हटले नाही. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्मच 'चंपा' असा आहे, म्हणून त्यांनी राग मानू नये, असा टोला लगावला.

ते पुढे म्हणाले, "चंद्रकांत पाटील जेथे जातात, तेथे प्रश्न निर्माण करतात. त्यांच्यासाठी भाजपच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना कोथरूड विधानसभेचे तिकीट नाकारले. मात्र, आता पदवीधर निवडणुकीसाठी पक्षाकडून आपला विचार होईल, अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु, भाजपने पुन्हा त्यांचे तिकीट नाकारले. त्यांना डावलून संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पाटील हे प्रश्नच निर्माण करतात."

राज ठाकरे म्हणाले,' तु तुझा प्रचार कर, बाकी मी बघतो'

पुणेकरांनी चंद्रकांत पाटलांना मोठ्या मनाने स्वीकारले आहे. मात्र, पदवीधर किंवा कोथरूड मतदार संघाच्या विकासासाठी त्यांनी किती प्रयत्न केले आहेत. याशिवाय प्रलंबित असलेल्या पदवीधर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी किती पुढाकार घेतला, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, असे जयंत पाटील यांनी नमूद केले.

काय म्हटले होते चंद्रकांत पाटील?

"तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना बोलता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणता, हे चालते?" अशी विचारणा करीत शरद पवार यांच्याबाबत असे बोलायचे नसल्याचे सांगत चंद्रकांत पाटलांनी पवार यांच्यावरील टीकेबाबत सारवासारव केली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'मी माझी बाजू मांडली. माझ्यासाठी हा विषयी संपला, तरीही त्यांना बोलायचे असल्यास बोलू देत', असे सांगून पाटलांनी टीकेच्या वादावर पडदा टाकला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागरिकांच्या प्रश्नावर बोलत नाहीत, तेव्हा पवार यांच्यावरील टीकेवर बोलायला त्यांच्याकडे वेळ कसा? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader jayant patil's criticism on bjp leader chandrakant patil