मी आता पूर्णपणे बरा, पुन्हा जोशाने प्रचार करणार: रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

या काळात पक्षाचे कार्यकर्ते, मित्र हितचिंतक यांनी काळजीतून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अनेकांना उत्तर देता आली नाहीत. माझी आपणा सर्वांनी हिच विनंती आहे, की आपण दिवसरात्र पक्षाच्या प्रचारासाठी सक्रीय राहत आहात. वाढत्या उन्हाची तमा न बाळगता प्रचार करत आहात, पण आपण देखील तब्येतीची काळजी घ्या.

पुणे : कोणतीही गोष्ट अंगावर काढली, की वाढत जाते आणि रुग्णालयाचे दौरे करावे लागतात. तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे गेले तीन दिवस हडपसरमधील नोबेल रुग्णालयात मला ऍडमीट व्हावे लागले. शस्त्रक्रिया करावी लागली. रुग्णालयाचे डॉक्टर, नर्सेस यांनी अहोरात्र काळजी घेतल्याने मी आत्ता पुर्णपणे बरा असून पुन्हा त्याच जोशाने प्रचारास सुरवात करत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी फेसबुकवरून लिहिले आहे.

रोहित पवार यांनी लिहिले आहे, की या काळात पक्षाचे कार्यकर्ते, मित्र हितचिंतक यांनी काळजीतून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अनेकांना उत्तर देता आली नाहीत. माझी आपणा सर्वांनी हिच विनंती आहे, की आपण दिवसरात्र पक्षाच्या प्रचारासाठी सक्रीय राहत आहात. वाढत्या उन्हाची तमा न बाळगता प्रचार करत आहात, पण आपण देखील तब्येतीची काळजी घ्या. आपल्या सर्वांच्या कष्टामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचा विजय होणार हे निश्चित आहे. फक्त त्याचसोबत आपली तब्येत तितकीच जपणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Rohit Pawar admitted in Hospital Pune