कॅग अहवालाबाबत चौकशी करावी आणि वस्तुस्थिती मांडावी : पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

गेली पाच वर्षे आपण भाजपचे राज्यात सरकार होते. कॅगने दिलेला अहवाल गंभीर असून, 66 हजार कोटींचा ताळमेळ लागत नसल्याचे दिसत आहे. आताच्या सरकारने या सर्व गोष्टींची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. 

पुणे : गेली पाच वर्षे आपण भाजपचे राज्यात सरकार होते. कॅगने दिलेला अहवाल गंभीर असून, 66 हजार कोटींचा ताळमेळ लागत नसल्याचे दिसत आहे. आताच्या सरकारने या सर्व गोष्टींची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देवेंद्र फडणवीस सरकारच्या 2017-18 या वर्षात 66 हजार कोटीचा ताळमेळ लागत नसल्याचे सांगण्यात आले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात राज्याची स्थिती काय होती यावरचा कॅगचा अहवाल मांडण्यात आला. त्यामध्ये कॅगने हा खळबळजनक खुलासा केला आहे. याच मुद्द्यावरून शरद पवार यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेत चौकशीची मागणी केली.

नितीश कुमारही मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात; 'या' कायद्यास नकार

शरद पवार म्हणाले की, ''देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. पाच वर्षांत राज्यात आर्थिक शिस्त उद्ध्वस्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Sharad Pawar criticize BJP government