Chinchwad By-Election: चिंचवड पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, अजित पवारांचा पठ्ठ्या घराणेशाहीला धडक देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad By-Election

Chinchwad By-Election: चिंचवड पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, अजित पवारांचा पठ्ठ्या घराणेशाहीला धडक देणार

Chinchwad By-Election: भाजपचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाल्याने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे चित्र पाहिला मिळत आहे.

दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना या जागेवर तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विठ्ठल काटे कामाला लागले आहेत. जर तिकीट दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला मिळाले तर राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही. अशी चर्चा आहे मात्र पक्षाकडून अधिकृत कोणतीही माहिती अद्याप नाही.

हेही वाचा: Nagpur Crime: नागपूर हादरलं! शेतकरी महिलेवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या

मात्र लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनाही तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शंकर जगताप यांना तिकीट मिळाल्यास चिंचवडमध्ये निवडणूक होण्याची शक्यता दाट आहे. तर विठ्ठल काटे यांचे समर्थक कामाला लागले आहेत.

चिंचवडमध्ये पोस्टरबाजी सुरू झाली आहे. विठ्ठल काटे यांचे समर्थकांचे सोशल मिडीयावर वार चालू झाले आहेत. काही समर्थकांनी तर फिक्स आमदार असा अशयाचे पोस्टर वायरल करत आहेत. त्यामुळे काटे यांनी चांगलीच तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र या पोटनिवडणूकीत अजित पवार काय भूमिका घेणार हे पाहवं लागणार आहे. अजित पवार यांचे जवळचे सहकारी म्हणून दिवंगत लक्ष्मण जगताप यांती ओळख होती त्यामुळे आता निवडणूकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा- मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

टॅग्स :ChinchwadNCP