Nagpur Crime: नागपूर हादरलं! शेतकरी महिलेवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या

नागपूरमध्ये महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार
crime news
crime newsesakal
Updated on

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. दरम्यान नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे येथे महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

crime news
दिवसभरात देशात काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? वाचा एका क्लीकवर

नागपूर जिल्ह्यातील सुरेवानी गावात ही घटना घडली आहे. या घटनेत तिन आरोपी सामील होते. या तिघांनी वेळ साधत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी तातडीने तपास करत या तीनही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. पीडिता एकटी असल्याचे पाहून नराधम तिच्याकडे गेले, आणि महिलेकडे शरीरसुखाची मागणी करू लागले मात्र महिलेने विरोध केला असता तिला मारहाण करत तिघांनी सामूहिक बलात्कार केला.

त्यानंतर देखील हे आरोपी थांबले नाहीत त्यांनी महिलेची धारधार कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ही महिलेवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार आरोपींनी केला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

हेही वाचा- मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com