राज्यमंत्री भरणे यांनी भरला विनामास्क १०० रुपये दंड

राजकुमार थोरात
Sunday, 1 November 2020

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी  जंक्शन (ता. इंदापूर) येथे विनामास्कचा १०० रुपयांचा दंड भरला असून, जनतेने भरणे यांच्या कृतीचा आदर्श घेवून विनामास्क फिरणे बंद करुन कोरोना आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

वालचंदनगर : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी  जंक्शन (ता. इंदापूर) येथे विनामास्कचा १०० रुपयांचा दंड भरला असून, जनतेने भरणे यांच्या कृतीचा आदर्श घेवून विनामास्क फिरणे बंद करुन कोरोना आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या चार दिवसांमध्ये १७१ कोरोना रुग्ण आढळले असून, काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यामध्ये शनिवार (ता. ३१) अखेपर्यंत  कोरोना रुग्णांची संख्या ३३६४ पर्यंत पोहचली आहे. तालुक्यातील नागरिक बेजाबदारपणे वागत असून, बिनधास्तपणे विनामास्क फिरत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच अनेक ठिकाणी गर्दी करीत असून सोशल डिस्‍टन्सचा ही फज्जा उडत आहे. दिवाळीच्या तोंडावर रुग्ण वाढू लागल्याने  इंदापूरकरांसाठी धोक्याची घंटा आहे. आज रविवार (ता. १) रोजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते जंक्शनमध्ये एका खासगी दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अनेक नागरिक विनामास्क कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होते. यावेळी भरणे यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करुन शासनाच्या नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याच्या सुचना दिल्या. भाषण सुरु असताना भरणे यांचा मास्क खाली सटकला होता. भाषणानंतर भरणे यांनी स्वत:हून विनामास्कचा शंभर रुपयांचा दंड लासुर्णे ग्रामपंचायतीकडे भरला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, मोहन ठोंबरे, लक्ष्मण साळवे उपस्थित होते. लोकप्रतिनिधी दत्तात्रेय भरणे कोरोनाच्या बाबतीमध्ये गंभीर असताना जनता मात्र कोरोनाच्या बाबतीमध्ये गांभीर्याने वागत नसल्याने येणाऱ्या काळामध्ये तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भिती असून नागरिकांनी वेळेमध्ये सावध होवून योग्य दक्षता घेण्याची गरज आहे. भरणे यांनी भरलेल्या दंडातून इंदापूरची जनता बाेध घेणार का ? हे महत्वाचे असून कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP minister pays Rs 100 fine without mask