सुप्रिया सुळेंनंतर अजित पवारांचाही पुणे महापालिकेत सत्ता खेचण्याचा दावा

 NCP in power in the coming election of pune Municipal Ajit Pawar
NCP in power in the coming election of pune Municipal Ajit Pawar

पुणे : ''येत्या महापालिका निवडणुकीत सत्ता खेचून आणू, असे सांगत आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असेल'', असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गुरुवारी पुणे महापालिकेच्या विकासकामांचा आढावा घेतला. यानंतर फडणवीस यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या चांगल्या कामाची पोचपावती दिली. तसेच यापुढेही महापालिकेत आमचीच सत्ता असेल, असे सांगितले. 

शरद पवारांच्या आधीच केला पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न; पडळकरांवर गुन्हा दाखल

फडणवीस यांनी पुणे महापालिकेतील योजनांचा आढावा घेण्याच्या निमित्ताने आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षातील लोक 'पुन्हा आमची सत्ता येणार' असे म्हणतात तर विरोधी पक्षातील लोक 'आम्ही सत्ता खेचून आणणार' असे म्हणतात. महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आम्ही यावेळी सत्ता खेचून घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com