राज्य सरकारमध्ये खरचं अस्वस्थता आहे का? वाचा शरद पवार यांचं उत्तर

टीम ई-सकाळ
मंगळवार, 7 जुलै 2020

मातोश्रीवर बैठक घेण्याचं कारण काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून का बाहेर पडत नाहीत? अशा चर्चेतील अनेक विषयांवर पवार यांनी उत्तरं दिली.

पुणे : 'पारनेरचा नगरसेवक राष्ट्रीय पातळीवरील चर्चेचा विषय होऊ शकत नाही.' 'अस्वस्थता नाराजी आहे, हे सांगून तुम्ही आमच्या ज्ञानात भर टाकली धन्यवाद.' 'कोरोनाचं संकट आल्यानं राज्यात नियोजित कामं थांबली.' अशा अनेक विषयांवर आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टोक्ती दिली. पुण्यात आज, पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी वाचा - 'शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला मातोश्रीवर जावं लागतं'

मातोश्रीवर बैठक घेण्याचं कारण काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून का बाहेर पडत नाहीत? अशा चर्चेतील अनेक विषयांवर पवार यांनी उत्तरं दिली. पवार म्हणाले, 'सामनाचे संपादक संजय राऊत माझी मुलाखत घेणार होते. तिथून मातोश्रीला जाणं सोयीचं होतं. त्यामुळं तिथं बैठक घेतली. अनेक प्रमुख नेते घरातून बाहेर पडले तर गर्दी होते. त्यामुळं आम्ही सभा, समारंभ बैठका टाळत आहोत. मुळात मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर आल्यानंतर जे निर्णय घेतले होते. ते कोरोनाच्या संकटामुळं थांबवाले लागले. या काळात सरकारनं केलेल्या कामावर आम्ही समाधानी आहोत. मुख्यमंत्री 14-15 तास बैठका घेत आहेत. अपेक्षेप्रमाणं कामं होत आहेत. या काळात टीका होऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे. सरकारमध्ये अस्वस्थता, नाराजी आहे, हे सांगून तुम्ही आमच्या ज्ञानात भर टाकली धन्यवाद.'

आणखी वाचा - पुण्यातील मार्केट शिफ्ट करण्याचा पॉझिटिव्ह विचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp president sharad pawar press conference statement about cm uddhav thackeray