esakal | Video: रणजी सामना सुरु होताच शरद पवार यांनी...
sakal

बोलून बातमी शोधा

Untitled-2.gif

Video: रणजी सामना सुरु होताच शरद पवार यांनी...

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : येथे आजपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या पहिल्या रणजी सामन्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभा पवार यांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला.

बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये पहिला रणजी सामना खेळविला जात आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज वेळ काढला असून ते पहिल्या चेंडूपासून ह्या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांच्या समवेत प्रतिभा पवार यादेखील आज आवर्जून या सामन्यासाठी उपस्थित होत्या.

सामना सुरू झाल्यानंतर उत्तराखंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड असा सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या चार शतकातच महाराष्ट्राचे चार खेळाडू बाद झाल्याने महाराष्ट्रावर संकट गहिरे झाले होते. बारामतीत आज सामन्याचा आनंद घेण्यासाठी रसिक क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

loading image