
पुणे : ‘संविधान का बदलावे?’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे गुरुवारी (ता. ३१) आंदोलनाद्वारे निषेध नोंदविण्यात आला. पुस्तकाचे लेखन करणाऱ्या आणि त्याचे प्रकाशन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. संविधानाच्या प्रति नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले.