Sharad Pawar Resign : पुण्यातील कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर
ncp pune acitivist gave resign to withdraw sharad pawar resign as ncp chief politics pune
ncp pune acitivist gave resign to withdraw sharad pawar resign as ncp chief politics pune sakal

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्याने पुण्यातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. हा निर्णय पचनी पडणारा नसल्याने भावुक झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर एकत्र येऊन ‘साहेबांनी हा निर्णय मागे घ्यावा’ अशी साद घातली. तसेच शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला.

पवार यांच्या निर्णयामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पवार यांनी पक्षात भाकरी फिरवणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. पण ते स्वतः पदाचा राजीनामा देतील असे अपेक्षीत नव्हते. मुंबईत हा निर्णय जाहीर होताच पुण्यातील सैरभैर झालेले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस भवनात एकत्र आले.

अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह इतर नेते काय भूमिका मांडत आहेत याकडे त्यांचे लक्ष लागलेले होते. पवार साहेब निर्णय बदलण्यास तयार नसल्याने काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. साहेब राजीनामा मागे घ्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, सदानंद शेट्टी, मृणालिनी वाणी, नीलेश निकम, काका चव्हाण, अजिंक्य पालकर, विक्रम जाधव, फईम शेख, गुरुमितसिंग गिल यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

‘‘शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला निर्णय हा पचनी पडणारा नाही. जो पर्यंत साहेब राजीनामा मागे घेत नाहीत, तो पर्यत आम्हीही पदावर राहणार नाही. त्यामुळे पुण्यातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिले आहेत.’’

- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

रक्ताने लिहिले पत्र

पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने कार्यकर्त्यांनी हा निर्णय बदलावा अशी मागणी केलेली आहे. त्याताच पुण्यातील साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप काळे यांनी स्वतःच्या रक्ताने पवार यांना पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. तुम्ही आमचे दैवत आहात, माझ्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांना तुम्ही घडविले आहे. आम्हाला तुमच्या नेतृत्वात काम करायचे आहे असे पत्रात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com