'NCP'च्या महिला नेत्याची सोशल मीडियावर बदनामी; 16 जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये १६ जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rupali Patil-Thombare
Rupali Patil-Thombareesakal
Summary

पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये १६ जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आता पुण्यातून आणखी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याची सोशल मीडियावर बदनामी करण्यासंदर्भात 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात अपशब्द आणि बदनामी केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

Rupali Patil-Thombare
भाजप-मनसे युती RSS च्या पुढाकाराने होणार? मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट

पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये १६ जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनम गुंजाळ यांनी ही दिली तक्रार दिली आहे. फेसबुक वर '१ करोड ताईवर नाराज असणाऱ्याचा ग्रुप' नावाच्या एका गृपवर शिवीगाळ झाली होती. यासंदर्भात सोशल मीडियावर महिला पदाधिकाऱ्यांची बदनामी केली जात आहे, अशी तक्रार देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ आणि अश्लील भाषेत वक्तव्य केली जात होती. त्यामुळे याप्रकरणी सागर गजानन पाटील, प्रसाद राणे, ध्रुवराज ढकेडकर, राजेश दांडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड इतर ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

Rupali Patil-Thombare
अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ, दिलासा नाहीच

दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या त्यांच्या वक्तव्यांमुळे बऱ्याचवेळा चर्चेत असतात. अनेकवेळा त्यांनी धाडाडीची वक्तव्यही केली आहे. राष्ट्रवादी विरोधात बोलणाऱ्या अनेकांवर त्यांनी जशास तसे उत्तरही दिली आहेत. आता या प्रकरणाचा पोलिस तपास करत असून यावर त्या कोणती प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com