
मार्केट यार्ड : पुणे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून सर्वांची इडी व प्राप्तीकर विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करावी. तसेच, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष न्यायालयात धाव घेईल, अशी माहिती पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.