राष्ट्रवादीने सासवड पालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे : प्रदिप गारटकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीने सासवड पालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे : प्रदिप गारटकर

राष्ट्रवादीने सासवड पालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे : प्रदिप गारटकर

सासवड : येथील नगरपालिकेची आगामी निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या घड्याळ या चिन्हाद्वारे लढवावी ही भावना पक्षातील वरीष्ठ पक्षश्रेष्ठींना सांगितली जाईल. पक्षाच्या स्वतःच्या ताकतीवर लढण्याची हिमंत येथे व्यक्त झाला, याचे समाधान वाटते. मात्र एकजुट दाखविली तर एकदिलाने तर पालिकेत आपली सत्ता येऊ शकते. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे., असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी येथे व्यक्त केले.

हेही वाचा: सिद्धूंचा काँग्रेसवर लेटरबॉम्ब! सोनिया गांधींना चार पानी पत्र

सासवड (ता. पुरंदर) येथील मार्केटयार्ड भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात सासवड शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक नगरपालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबन टकले, माजी तालुकाध्यक्ष संजय ज्ञा. जगताप, नगरसेवक दिपक टकले, मंगल म्हेत्रे, माजी नगराध्यक्ष दत्तानाना जगताप, अॅड. कला फडतरे, भानुदास जगताप, बंडुकाका जगताप, बाळासाहेब भिंताडे, दिपक म्हेत्रे, संतोष जगताप, अॅड. प्रकाश खाडे, पैलवान विनोद जगताप, गिरीश जगताप, महेश जगताप, अतुल जगताप, दत्तोबा जगताप, मनिष रणपिसे, नीता सुभागडे, मनोहर जगताप आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल गिरमे यांनी सासवड शहरातील पक्षीय कार्यक्रम, उपक्रम व वाटचाल याचा आढावा दिला. ते म्हणाले., सासवडला पक्षाची ताकत आहे, हे यापूर्वी आपण काही निवडणुकीत पाहीले आहे. पक्षाची अजून ताकत वाढवून पक्षाचे चिन्ह घरा - घरात जावे, याकरीता साऱया कार्यकर्त्यांच्या भावनांना पक्षाने बळ द्यावे. नगरसेवक टकले, नगरसेविका म्हेत्रे यांनी ताकत लावली तर नगरपालिकेत अनेक कार्यकर्ते पक्षाचे निवडुण येतील., हा आमचा अनुभव आहे. यावेळी मनोगतात संजय ज्ञा. जगताप, अॅड. खाडे, अॅड. फडतरे, बबन टकले, महेश जगताप यांनीही शरद पवार, उप मुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी ताकत व संधी द्यावी, सोने करु., असे स्प्ष्ट केले.

Web Title: Ncp Should Start Preparations For Saswad Municipal Corporation Elections Pradip Garatkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NCP
go to top