पुणे
Rupali Chakankar: चाकणकर-ठोंबरेंमध्ये वाद का पेटला? पक्षाने धाडलेल्या नोटिशीत नेमकं काय?
NCP Issues Show Cause Notice to Adv. Rupali Thombre Patil Over Comments Against Rupali Chakankar: रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाने नोटीस पाठवली असून खुलासा मागवला आहे.
पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्य केल्याप्रकरणी पक्षाने ॲड. रूपाली ठोंबरे पाटील यांना शुक्रवारी रात्री कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याबाबत ७ दिवसांत खुलासा न केल्यास ठोंबरे पाटील यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीची पक्षाने तत्काळ दखल घेत ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

