'राष्ट्रवादी'च्या रुपाली चाकणकर खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल; चिंतेचे कारण नाही!

Rupali_Chakankar
Rupali_Chakankar

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रकृती थोडीशी बिघडल्याने त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांना कोरोना आणि अन्य कोणताही गंभीर आजार नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपासून कुटुंबियांनीही स्पष्ट केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पुढच्या दोन दिवसांत त्यांना घरी सोडण्याची प्रक्रिया केली जात आहे, असे सांगण्यात आले.

कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर लॉकडाउनच्या काळात राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहिमांत चाकणकर यांचा पुढाकार होता. पुण्यातील धायरीतील लोकांच्या मदतीपासून अगदी बहुतांशी जिल्ह्यातील कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी चाकणकर या राज्यभर भेटीगाठी घेत होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तात्पुरते उपचार घेण्यात आले, त्यानंतर खबरदारी म्हणून कुटुंबीयांनी त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याचवेळी त्यांची कोरोनाची चाचणीही करण्यात आली. मात्र तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना कोरोना नसल्याने त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

लॉकडाउन असतानाही चाकणकर आणि त्यांच्या काही सहकारी पदाधिकारी राज्यातील महिलांच्या अडचणी जाणून घेत लोकांच्या संपर्कात होत्या. नुकत्याच मराठवड्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी स्वत: 'होम क्वॉरंटाइन' करून घेतले होते. त्यानंतरच्या १४ दिवसांनी त्या पुन्हा घराबाहेर आल्या आणि लोकांच्या मदतीला धावल्या. तरीही कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक तेवढी काळजी त्या घेत राहिल्या.

सध्या हाहाकार माजविलेल्या कोरोनाची राजकारण्यांनाही लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांपासून अगदी पुण्यातील प्रमुख राजकीय नेते कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com