राष्ट्रवादीच्या विद्यार्थी तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

कंपनीत माल टाकायचा नाही, माल टाकल्यास गाडी फोडून टाकीन अशी थेट-थेट धमकी देणा-या शिरुर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा अध्यक्ष अमित गव्हाणे याचेवर शिक्रापूर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारताच राजकीय व्यक्तीवर हा सलग दूसरा गुन्हा असून यावेळी अमित गव्हाणेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचा नंबर लागला आहे.

शिक्रापूर - कंपनीत माल टाकायचा नाही, माल टाकल्यास गाडी फोडून टाकीन अशी थेट-थेट धमकी देणा-या शिरुर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा अध्यक्ष अमित गव्हाणे याचेवर शिक्रापूर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारताच राजकीय व्यक्तीवर हा सलग दूसरा गुन्हा असून यावेळी अमित गव्हाणेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचा नंबर लागला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेशी संबंधित व शिरुर बाजार समितीचे माजी संचालक तथा शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांचेवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. ही कारवाई राजकीय असल्याची चर्चा होत असतानाच पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी थेट राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आघाडीच्या तालुकाध्यक्ष अमित गव्हाणेवर गुन्हा दाखल करुन टिकाकारांना सडेतोड उत्तर दिले. दरम्यान दोन दिवसांपूर्वी (ता. ०३) दुपारी बाराचे सुमारास सणसवाडी (ता. शिरूर) येथील आयटीडब्ल्यू कंपनीतून आपला माल खाली करुन निघालेल्या टेंपोला अमित गव्हाणे याने अडविले व टेंपो मालकाला फोन करण्याचा दम चालकाला दिला व या कंपनीत माल कशाला टाकला. या कंपनीत यापुढे माल टाकायचा नाही. माल टाकल्यास गाडी फोडून टाकीन अशी धमकी दिली. यावरुन अमित गव्हाणे व त्याचा एक साथीदार या दोघांवर दमदाटी, गाडी अडविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गव्हाणे याला पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.

Lockdown Effect : फक्त ३० टक्केच हॉटेल्स सुरू; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सद्यस्थिती

अपहरण प्रकरणातील गणेश लोखंडेला जामिन मंजुर
दोन दिवसांपूर्वी शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांचेवर दाखल झालेल्या खंडणी-अपहरण प्रकरणातील एक आरोपी गणेश लोखंडे याला अटक करुन त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली गेली होती. त्याला आज शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केल्याची माहिती तपास अधिकारी मयुर वैरागकर यांनी दिली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP student files case against tahsil president