esakal | LPG दरवाढ: पंतप्रधानांना पाठवल्या चक्क शेणाच्या गोवऱ्या
sakal

बोलून बातमी शोधा

LPG दरवाढ: पंतप्रधानांना पाठवल्या चक्क शेणाच्या गोवऱ्या

LPG दरवाढ: पंतप्रधानांना पाठवल्या चक्क शेणाच्या गोवऱ्या

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती: वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या बारामतीतील राष्ट्रवादी तालुका (NCP) व शहर महिला काँग्रेसच्या वतीने चक्क पंतप्रधानांना(PM Modi) शेणाच्या गोवऱ्या पाठविण्यात आल्या. गॅस (LPG) परवडत नसल्याने आता चुलीवरच स्वयंपाकाची पाळी आल्याचे नमूद करत गोवऱ्या पाठविल्या गेल्या.

हेही वाचा: ड्रोन सर्व्हेमुळे गावठाण भूमापनात अचुकता येणार - अजित पवार

गॅसदरवाढीविरोधात आज महिलांच्यावतीने आंदोलन केले गेले. केंद्राने गँसदरवाढ करत आता पुन्हा एकदा शेणाच्या गोवऱ्या चुलीत टाकून स्वयंपाक करण्याची वेळ आणली असल्याचे सांगत आज केंद्राचा निषेध राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.

एकीकडे सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकूटीला आला आहे. केंद्र सरकार या भाववाढीवर कोणतेही नियंत्रण आणत नसल्याचे सांगत यावेळी दरवाढीबाबत केंद्राचा निषेध करण्यात आला.

हेही वाचा: Pune : पावसाळी गटारांवरील लोखंडी झाकणे चोरणाऱ्यांना अटक

बारामतीतील पोस्ट कार्यालयात महिलांनी थेट पंतप्रधानांच्या नावे शेणाच्या गोवऱ्यांचे पार्सल पाठवून दिले. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या तालुकाध्य़क्षा वनिता बनकर, युवती अध्य़क्षा आऱती शेंडगे, संगीता पाटोळे, भाग्यश्री धायगुडे, दिपाली पवार, कविता वाघमारे, रेश्मा शेंडगे, आयशा शेख आदी सहभागी झाल्या होत्या.

loading image
go to top