पुणे : विधानसभेनंतर आता पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

- सर्वाधिक 7 समित्यांत सत्ता.

- काँग्रेस, सेना, भाजपकडे प्रत्येकी दोन समित्या.             

पुणे : पुणे जिल्ह्यातील तेरापैकी सर्वाधिक सात पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम राखले आहे. यामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीचाच बोलबाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन पंचायत समित्या मिळाल्या आहेत.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      

शिवसेना आणि काँग्रेसने आपापल्या प्रत्येकी दोन पंचायत समित्यांवरील सत्ता कायम राखली आहे. मात्र, काँग्रेसची इंदापूरची पंचायत समिती ही भाजप नेते हर्षवर्धन पाटील समर्थकांच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळे या पंचायत समितीवर केवळ तांत्रिकद्रष्ट्या काँग्रेसची सत्ता असणार आहे.

पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी नलिनी लोळे

राष्ट्रवादी काँग्रेसला हवेली पंचायत समितीची सत्ता गमवावी लागली आहे. ही पंचायत समिती भाजपच्या ताब्यात गेली आहे. परिणामी भाजपला हवेली व मावळ या दोन समित्यांवर सत्ता मिळाली आहे. काँग्रेसकडे इंदापूर आणि वेल्हे तर शिवसेनेकडे पुरंदर आणि खेड या दोन समित्या गेल्या आहेत.

बारामती, दौंड, शिरूर, भोर, मुळशी, आंबेगाव आणि जुन्नर या सात पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.     

जुन्नरमध्ये महाविकास आघाडी                  

जुन्नर पंचायत समिती पदाधिकारी निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. येथे सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा तर उपसभापती शिवसेनेचा झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP won 7 Panchayat Samiti Election