Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

माळेगाव बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यावर चार ते पाच अज्ञात युवकांनी लाकडी दांडक्याने व दगडाच्या सहाय्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.
Malegaon Crime

Malegaon Crime

sakal

Updated on

माळेगाव - माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यावर चार ते पाच अज्ञात युवकांनी लाकडी दांडक्याने व दगडाच्या सहाय्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. डी.डी. जगताप (रा. भिकोबानगर - पणदरे) असे गंभीर जखमी झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून, त्यांच्या डोक्याला खोल जखमा झाल्या आहेत. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com