

Suyog Satpute Elected Mayor
esakal
-कल्याण पाचंगणे
माळेगाव: माळेगाव बुद्रूक(ता.बारामती) नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूकीच्या निमित्ताने झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जनमत विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह १२ जागांवर यश संपादन केल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुयोग शामराव सातपुते यांनी १० हजार ९७८ मते घेत विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार पक्षाचे परस्कृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश सायबू भोसले यांना १८२० इतकी मर्य़ादित मते मिळाली. नगरसेवकपदाच्या १७ प्रभागांपैकी ५ जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय खेचून आणला. राष्ट्रवादीचे नाराज कार्यकर्ते दीपक तावरे यांनी सदर अपक्षांचे नेतृत्व केले होते.