NDA : पुण्यात एनडीएच्या १५१ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात; १,२५० छात्र सहभागी, ३६४ जण अधिकारी पदवीधर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मार्गदर्शन

NDA Passing Out Parade : पुण्यातील खेत्रपाल मैदानावर एनडीएच्या १५१ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात पार पडला. राजनाथ सिंह यांनी छात्रांना आधुनिक युद्धातील सायबर, अवकाश आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
NDA Passing Out Parade

NDA Passing Out Parade

esakal

Updated on: 

प्रज्वल रामटेके

पुणे, ता. २९ : पहाटेच्या गुलाबी थंडीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात, ऐतिहासिक खेत्रपाल मैदानावर ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ या सुरांनी चैतन्य संचारले. शिस्तबद्ध पावले टाकत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १५१ व्या तुकडीने दीक्षान्त संचलनात सहभाग घेतला. ‘सारे जहाँ से अच्छा’ आणि ‘कदम कदम बढायें जा’च्या तालावर संचलन करत छात्रांनी ‘अंतिम पग’ची पायरी पार केली आणि तीन वर्षांचे खडतर लष्करी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात, लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना देत देशसेवेच्या नव्या प्रवासाला निघालेल्या या युवा छात्रांनी रविवारी (ता.२९) एकच जल्लोष केला. निमित्त होते ते ‘एनडीए’च्या १५१ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनाचे.

Loading content, please wait...