
Fugitive Drug Accused 'Azim Bhai' Dies Suddenly in Police Custody; Investigation Underway
Sakal
पुणे : अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी अझीम अबू सालेम ऊर्फ ‘अझीम भाऊ’ (वय ५०, रा. उरण) याचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने कोंढव्यातून त्याला ताब्यात घेतले होते. ससून रुग्णालयात उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.