एनडीटीव्हीचे डॉ.प्रणव रॉय यांना परदेशी जाण्यापासून रोखले; सीबीआय चौकशी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

एनडीटीव्हीचे प्रमुख डॉ. प्रणय रॉय यांना मुंबई विमानतळावर परदेशी जाण्यापासून रोखण्यात आले आहे. सीबीआयने त्यांची तपासणी केली असून त्यांना मुंबई विमानतळावर परदेशी जाण्यापासून थांबवल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : एनडीटीव्हीचे प्रमुख डॉ. प्रणव रॉय यांना मुंबई विमानतळावर परदेशी जाण्यापासून रोखण्यात आले आहे. सीबीआयने त्यांची तपासणी केली असून त्यांना मुंबई विमानतळावर परदेशी जाण्यापासून थांबवल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. एनडीटीव्हीकडून यासंबधी त्यांच्या माध्यम स्वातंत्र्यावर सातत्याने गदा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सरकारवर करण्यात आला आहे.

डॉ. प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिका रॉय या परदेशात जात असताना त्यांना विमानतळावर थांबवून चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सीबीआयच्या सूचनेनुसार राधिका रॉय आणि प्रणय रॉय यांना विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हवाई प्रवास करण्यापासून रोखले. मनी लाँड्रिंग केस प्रकरणी त्यांची सीबीआय चौकशी करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.

प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा सीबीआयच्या माध्यमातून हा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप एनडीटीव्हीकडून करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDTV founders Prannoy and Radhika Roy stopped from flying abroad at Mumbai airport