Pune | उद्याच्या रोजगारसंधी देणाऱ्या शिक्षण पध्दतीची गरज; डॉ. रघुनाथ माशेलकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr.-Raghunath-Mashelkar
उद्याच्या रोजगारसंधी देणाऱ्या शिक्षण पध्दतीची गरज; डॉ. रघुनाथ माशेलकर

उद्याच्या रोजगारसंधी देणाऱ्या शिक्षण पध्दतीची गरज; डॉ. रघुनाथ माशेलकर

पुणे - सध्याच्या जगात मिळणारा रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी शिक्षण पद्धती राबवून उपयोगाची नाही, तर भावी काळात निर्माण होणाऱ्या रोजगारसंधीची शिक्षण पद्धती अमलात आणली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी आयोजित ऑनलाइन व्याख्यानात डॉ. माशेलकर बोलत होते. ‘रि- इन्व्हेंटिंग इंडियन एज्युकेशन, रिसर्च अॅण्ड इनोव्हेंशन सिस्टम’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी डॉ. माशेलकर यांचे स्वागत केले.

हेही वाचा: एमबीबीएसच्या विद्यार्थ्याच्या खुनाच्या निषेधार्थ ससूनमध्ये कॅंडल मार्च

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘मानवी इतिहासात अनेक शोध लागले असले तरी शिक्षणाने भवितव्य घडते, हा मानवाला लागलेला सर्वात महत्वाचा शोध आहे. भारतात शिक्षणाला पूर्वापार प्रतिष्ठा आहे, ‘राईट टू एज्युकेशन’ मुळे ही प्रतिष्ठा वाढली आहे. ‘राईट टू एज्युकेशन’ सोबत योग्य शिक्षण आणि शिक्षणाचा योग्य मार्गपण महत्वाचा आहे. शिक्षण आणि विज्ञान हातात हात घालून पुढे गेले पाहिजे. त्यातून उद्योजकता विकसित झाली पाहिजे. संधीची दारे स्वतःहून उघडली नाहीत तर नव्या संधी तयार केल्या पाहिजेत. डॉ. भालेराव म्हणाले, ‘विद्यार्थांच्या शिक्षणविषयक नैमित्तीक गरजांकडे लक्ष देतानाच त्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्याची गरज आहे. शिक्षण हे विद्यार्थीकेंद्री असले पाहिजे.’

loading image
go to top