देशातील शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणांची गरज - नितीन गडकरी

सध्या बदल जरुर होत आहे परंतु देशातील शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांमध्ये अजुनही सुधारणांची गरज आहे असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
Nitin Gadkari
Nitin GadkariSakal
Updated on
Summary

सध्या बदल जरुर होत आहे परंतु देशातील शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांमध्ये अजुनही सुधारणांची गरज आहे असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

किरकटवाडी - सध्या बदल (Changes) जरुर होत आहे. परंतु, देशातील शिक्षण (Education) आणि आरोग्याच्या सुविधांमध्ये (Health Facility) अजुनही सुधारणांची (Development) गरज आहे. असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे (ता. हवेली) येथे स्व. वैभव फळणीकर मेमोरियल फाऊंडेशन संचलित श्रीमती कौसल्या कराड धर्मार्थ ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर व सेवांकुर संस्थेचे संस्थापक अश्विनीकुमार तुपकरी हे मंचावर उपस्थित होते.

काही ठिकाणी शिक्षक आहेत, तर इमारत नाही, कुठे इमारत आहे, तर शिक्षक नाहीत, जेथे इमारत व शिक्षक दोन्ही आहेत, तेथे विद्यार्थी नाहीत. आणि जेथे शिक्षक, इमारत व विद्यार्थीही आहेत, तेथे चांगले शिक्षण मिळत नाही. अशी शिक्षणाची अवस्था आहे. आरोग्याच्या बाबतीतही देशात अशीच परिस्थिती असून कोरोना काळात ते दिसून आले आहे. असे म्हणत यामध्ये सुधारणांची गरज असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले. सिंहगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या आदिवासी कातकरी बांधवांना या रुग्णालयामुळे चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. स्व. वैभव फळणीकर मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून कौतुकास्पद कार्य होत असून, समाजातील मागासलेल्या घटकांना याचा मोठा फायदा होत आहे. अशा समाजोपयोगी कामात प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे गरजेचे आहे, असेही मत गडकरी यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार भिमराव तापकीर, जिल्हा परिषद सदस्या पूजा पारगे, डोणजे गावच्या सरपंच शितल भामे, विजय फळणीकर व स्व. वैभव फळणीकर मेमोरियल फाऊंडेशनचे विश्वस्त आदी मान्यवर उपस्थित होते.

चांगल्या कामासाठी कायदा मोडावा लागला तरी हरकत नाही

डोणजे येथील मुख्य रस्त्यापासून दवाखान्यापर्यंतचा सुमारे दिड किलोमीटर अंतराचा रस्ता अरुंद व खराब आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात घेऊन येण्यास त्यामुळे विलंब होतो. असे म्हणत विजय फळणीकर यांनी नितीन गडकरी यांच्याकडे हा रस्ता करुन देण्याची मागणी केली. त्याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की कायद्याने मला केवळ केंद्र सरकारच्या मालकीचे रस्ते तयार करण्याचा अधिकार आहे. तुम्ही सांगता तो रस्ता माझ्या अधिकारात येत नाही, परंतु हे चांगले काम आहे आणि चांगल्या कामासाठी कायदा मोडावा लागला तरी हरकत नाही, असे म्हणत गडकरी यांनी संबंधित रस्ता करुन देण्याचा शब्द दिला.

वन विभागाचे तुम्ही पाहून घ्या!

मी रस्ता करुन देण्याचा शब्द देत आहे परंतु याबाबत वन विभागाच्या काही परवानग्या लागल्या तर त्या तुम्हाला घ्याव्या लागतील. वन विभागाच्या हद्दीत रस्ता असेल तर कायदेशीर अडचणी येतात. त्यामुळे त्याबाबत आवश्यक त्या बाबींची पूर्तता तुम्हाला करावी लागेल असे गडकरी यांनी संस्थेच्या विश्वस्थांना बोलून दाखवले. त्यावेळी वन विभागामुळे रस्त्यांच्या कामात अनेक ठिकाणी निर्माण होत असलेल्या अडचणींची जाणीव सर्वांना झाली.

मिश्किल शैलीत साधला संवाद

नितीन गडकरी यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने हास्य विनोद करत उपस्थितांशी संवाद साधला. मी डॉक्टर नाही परंतु हल्ली एखाद्याचा नुसता चेहरा पाहीला तरी त्याचे आरोग्य ओळखतो असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पुणे-बेंगलोर तीन तासांत जाता येणार

सध्या नवीन रस्त्याच्या संदर्भात काम सुरू असून सिंहगड परिसरातूनच तो रस्ता जाणार आहे. पुणे-मुंबई महामार्गाला जोडून होणाऱ्या या रस्त्यामुळे पुण्यातून बेंगलोरला केवळ तीन तासांत पोहोचता येईल अशा दर्जाचा तो रस्ता असणार आहे असे गडकरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com